अध्यक्षांचे संदेश

Sansthapak Image

“शिक्षण म्हणजे मुलं आणि व्यक्तीमधील सर्वोत्तम कौशल्ये बाहेर काढण्याचे माध्यम होय. साक्षर होणे म्हणजे शिक्षणाचा अंत अथवा आरंभ नव्हे.”
एम. के. गांधी [हरिजन, ३१ जुलै १९३७]

मची गांधी विद्यालय शिक्षण संस्था ही राष्ट्रपिता म. गांधी यांच्या विचारांना अनुसरून चालणारी संस्था आहे. व्यक्तीचा सर्वांगीण विकास हेच शिक्षणाचे मुख्य ध्येय आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर मानवाला योग्य वळण लावण्याचा शिक्षण हा एक मार्ग आहे. प्रत्येकाच्या जीवनाचे ध्येय गाठल्याचा पाया खऱ्या शिक्षणात आहे . जर आपण भारतीय दृष्टीने शिक्षणाचा विचार केला तर शिक्षण हे सहा वेदांगांपैकी एक आहे. प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा सामर्थ्य आणि सूत्रबद्धरीत्या किंवा योग्य दिशेने मार्गक्रमन करून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या विकास करण्याची क्षमता शिक्षणात आहे. आणि म्हणूनच शिक्षण हि मानवी विकासासाठी निरंतर चालणारी प्रकिया आहे. याचाच अर्थ असा कि, शिक्षम हे असे एक माध्यम आहे कि ज्यामुळे अर्क अडचणींवर मात करून उन्नतीचा मार्ग शोधला जातो.

मला सार्थ अभमान वाटतो कि, ह्या संस्थेला पुढे नेण्याकरिता समर्पित होऊन कार्य करण्याची क्षणोक्षणी मला साथ मिळाली. मला ज्यांची मदत मिळत आहे ते बरेचसे संस्थाविश्वस्त हे ग्रामीण भागातूनव्ह आल्यामुळे ग्रामीण शिक्षणाचे खरे मूल्य त्यांना कळले आहे.

अध्यक्ष
- अ‍ॅड. आनंद जिभकाटे